नवी दिल्ली,17 फेब्रुवारी (पीएसआय)
लंडन ऑलिंपिकसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआईएच) च्या पुरुष गटाच्या क्वालीफायर्स स्पर्धेच्या माध्यमातून सहा संघ एक ऑलिंपिक सीट मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यजमान भारत आणि कॅनडा यांचे फायनलमध्ये जाणे निश्चित मानले जात आहे. मात्र फ्रांस आणि पोलंड आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात.
क्वालीफाईंग स्पर्धा उद्या शनिवारपासून मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये सुरू होत आहे. 18 ते 26 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत भारत, कॅनडा, फ्रांस आणि पोलंडशिवाय इटली आणि सिंगापुरचे संघदेखील सहभागी झाले आहेत.
एफआयएच ऑलिंपिकच्या आधी पहिल्या तीन ऑलिंपिक क्वालीफायर्स स्पर्धा आयोजित करणार असून भारतात होत असलेली ही या क्रमाने पहिली आहे. त्यानंतर डबलिन (आयर्लंड) मध्ये 10 ते 18 मार्चदरम्यान दुसऱ्या फेरीतील आणि काकामिगाहारा (जपान) मध्ये 26 एप्रिल ते 6 मेदरम्यान तिसऱ्या फेरीची क्वालीफाईंग स्पर्धा खेळली जाईल. या तीन आयोजनातून तीन संघ पुढे जाऊन त्या 9 संघाशी जोडले जातील जे आधीच लंडन ऑलिंपिक क्वालीफाय झाले आहेत.
एफआयएचच्या रँकिंगमध्य भारताला 10वे स्थान प्राप्त आहे. ऑलिंपिक हॉकीमध्ये भारताचा इतिहास सन्मानजनक आहे. 1928 साली ऍम्सटर्डम येथे आयोजित ऑलिंपिकनंतर भारतीय संघाने ऍथेंस ऑलिंपिकपर्यंत दरवेळी हॉकी स्पर्धेत भाग घेतला आहे. 2008 मध्ये या संघाला पहिल्यांदा बीजिंग ऑलिंपिकसाठी क्वालीफाय करता आले नाही. भारताच्या नावावर हॉकीची आठ सुवर्ण पदके आहेत. यापैकी सहा 1928 ते 1956 दरम्यान सलग मिळविली आहेत.
भारताने आपले शेवटचे ऑलिंपिक सुवर्ण 1980 मॉस्को ऑलिंपिकमध्ये जिंकले होते.