Sports

नवी दिल्ली,15 फेब्रुवारी (पीएसआय)
सचिन तेंडुलकरने आपले अंतिम शतक लावल्यापासून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पुर्ण केल्या आहे. या महान फलंदाजाच्या कारकीर्दतील फक्त ही दुसरी संधी आहे जेव्हा की, त्याने तिहेरी अंकात न पोहचता 1000 पेक्षा जास्त धावा बनवल्या आहे.
तेंडुलकरने आपला अंतिम शतक गेल्यावर्षी विश्वचषका दरम्यान 12 मार्चला नागपुरमध्ये दक्षिण अफ्रिकेविरूध्द जडले होते. हा त्याचा 99वा अंतरराष्ट्रीय शतक होता परंतु यानंतर त्याने 100वे शतक अर्थात महाशतकाची प्रतिक्षा 28 डावापर्यंत ओढली आहे. तेंडुलकरने या 28 डावात 35.75 च्या सरासरीने धावा बनवल्या आहे. त्याने श्रीलंकेविरूध्द ऍडिलेडमध्ये आपल्या 15 धावांच्या खेळी दरम्यान शतकाशिवाय 1000वी धाव पुर्ण केली. त्याने दरम्यान आठ अर्धशतकीय खेळी खेळली. या दिग्गज फलंदाजाने दरम्यान 11 कसोटी सामन्याच्या 21 डावात 37.04 च्या सरासरीने 778 धावा बनवल्या ज्यात सहा अर्धशतक समाविष्ट आहे. दुसरीकडे एकदिवसीय सामन्यात तो 223 धावा बनवु शकला व या स्वरूपात त्याने दरम्यान दोन अर्धशतक जडले. तेंडुलकर दरम्यान दोनदा 'नर्वस नाइंटीज' ला बळी पडला. यापूर्वी तेंडुलकरच्या कारकीर्दत 2007 मध्येही अशी स्थिती आली होती जेव्हा की, तो शतकासाठी तरसला होता. तेव्हा सचिनने शतकाशिवाय सतत 34 अंतरराष्ट्रीय खेळी खेळली होती. तेंडुलकरच्या कारकीर्दची ही स्थिती 23 जून 2007 ला आर्यंलडविरूध्द बेलफास्टमध्ये खेळलेल्या एकदिवसीय सामन्याने सुरू झाली होती ऑस्ट्रेलियाविरूध्द 26 डिसेंबर 2007 पासून मेलबर्नमध्ये सुरू झालेल्या कसोटी सामन्यापर्यंत चालली होती. त्याने या दरम्यान 29 अंतरराष्ट्रीय सामन्याच्या 34 डावात 47.24 च्या सरासरीने 1559 धावा जोडल्या होत्या. मास्टर ब्लास्टरने त्या दरम्यान 15 अर्धशतक जडले होते. तो तेव्हा सात वेळा 'नर्वस नाइंटीज' ला बळी पडला. यापैकी तीनदा तर तेंडुलकर फक्त एक धावाने चुकला होता. दरम्यान त्याने सहा कसोटी सामन्यात 44.40 च्या सरासरीने 444 धावा व 23 एकदिवसीय सामन्यात 48.47 च्या सरासरीने 1115 धावा बनवल्या होत्या. तेंडुकलरने दोन जानेवारी 2008 पासून ऑस्ट्रेलियाविरूध्द सिडनीमध्ये सुरू झालेल्या कसोटी सामन्यात शतकाची प्रतीक्षा समाप्त केली होती. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तेंडुलकलरला पहिल्या शतकासाठी 21 खेळीपर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती परंतु यापूर्वीच्या 20 डावात त्याने 553 धावा बनवल्या होत्या ज्यात चार अर्धशतक समाविष्ट होते. यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या शतकासाठीही खुप प्रतिक्षा केली होती.
तेंडुलकरने आपला पहिला शतक ऑगस्ट 1990 मध्ये इंग्लंडविरूध्द मॅनचेस्टरमध्ये जडल्यानंतर दुसरा शतक जानेवारी 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द सिडनीमध्ये जडले होते. दरम्यान त्याने 24 अंतरराष्ट्रीय खेळी खेळली ज्यात 29.54 च्या सरासरीने 650 धावा बनवल्या. त्याने सप्टेंबरपासून डिसेंबर दरम्यान 21 अंतरराष्ट्रीय खेळीतही शतक जडले नव्हते परंतु दरम्यान त्याच्या बॅटने 680 धावा निघाल्या होत्या.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News