Sports
Tuesday, 07 September 2010 22:13
मुंबई, 6 सप्टेंबर (पीएसआय)
बॉलीवुड अभिनेत्री नीतू चंद्राने मॅच फिक्सिंगच्या जाळयात अडकलेला पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आसिफ याच्याशी संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
नीतूचे प्रवक्ता डेल भगवागर यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, व्यक्तिशः नीतू मोहम्मद आसिफ अथवा इतर कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूला ओळखत नाही. तिचे नाव निराधार आरोपांवरून अकार मॅच फिक्सिंग प्रकरणात गोवले जात आहे.
''नीतू तर आसिफ सारख्या मिळत्या जुळत्या दुसऱ्या कोणा व्यक्तीलादेखील ओळखत नाही. हे प्रकरण उघडकीस आल्याच्या काही मिनिटातच मी तिला भेटलो होतो आणि मी तिला आपल्या ब्लॅकबेरी फोनद्वारे इंटरनेटवरील आसिफचे छायाचित्र दाखविले होते.
'याबाबत नीतूने आश्चर्य व्यक्त केले. कारण ती आसिफला ओळखतदेखील नाही. आपला मोबाइल नंबर मॅच फिक्सिंगशी सबंधीत यादीत कसा काय समाविष्ट करण्यात आला, यावरून ती बुचकळयात पडली आहे. हा एक कट आहे.
नीतूचे नाव यादीत आले आहे. ते स्कॉटलँड यार्ड आणि इंटरपोलने ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सोपविले आहे. इंटरपोल आणि स्कॉटलँड यार्डने ही यादी आसिफची माजी प्रेयसी आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिककडून मिळालेल्या माहितीच्याआधारे तयार केली आहे. या यादीत आसिफने 2009 साली फोनद्वारे संपर्क साधलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
यादीत मुंबईतून एकमेव फोन नंबर असून तो नंबर नीतूचा आहे. यावरून नीतूदेखील आसिफबरोबर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे पुढे येत आहे.
Add comment