Sports
Tuesday, 07 September 2010 22:13
लंडन,6 सप्टेंबर (पीएसआय)
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जेफ्री बायकॉट यांनी मॅच फिक्सिंगबाबत आयसीसीवर टिका केली.
बायकॉट यांनी एका वृत्तपत्राच्या स्तंभलेखात लिहीले की आयसीसी पाकिस्तानी खेळाडूंचा भ्रष्टाचार रोंखण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
द डेली टेलीग्राफमधील स्तंभलेखामध्ये बॉयकॉट म्हणतात, आयसीसीच्या अपयशामुळेच पाकिस्तानी क्रिकेटपटू वारंवार मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होत असल्याच्या बातम्या येत आहे.
बायकॉट यांनी लिहीले की पाकिस्तानी खेळाडू वारंवार मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होत असल्याची वृत्त येणे ही दुःखद बाब आहे. हे आयसीसीचे अपयश असून त्यांनी या विषयाला कधीही गांभीर्याने घेतले नाही. आयसीसीला जर असे प्रकरण सांभाळणे शक्य होत नसेल तर हे काम माझ्यासारख्या माजी क्रिकेटपटूकडे सोपवून द्यावे.
बायकॉट यांनी आरोपी खेळाडूंना पाठीशी घालण्याबाबत पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सरकारवरही टिका केली आहे. ते म्हणतात, आपले खेळाडू मॅच फिक्ंसिगमध्ये सहभागी आहेत हे पाकिस्तानने मान्य केले पाहिजे. आपण सर्वांनी मिळून या समस्येवर तोडगा काढण्याची हीच योग्य वेळ आहे. डोळे बंद करून वादळ थांबण्याची वाट बघितल्याने काहीच होणार नाही. डोळे उघडल्यानंतर नुकसानीचे वाट बघणे मूर्खपणा आहे.
Add comment