Sports
Tuesday, 07 September 2010 22:13
लंडन,6 सप्टेंबर (पीएसआय)
पाकिस्तान कसोटी संघातील सलामीवीर यासिर हमीदने ब्रिटिश वृत्तपत्र 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' वर त्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याने आपल्या सोबतच्या खेळाडूंवर मॅचफिक्सिंगचा कोणताही आरोप केलेला नव्हता.
या वृत्तपत्राने हामिदच्या माध्यमातून रविवारी खुलासा केला होता की, पाकिस्तानी खेळाडू जवळपास सर्वच सामने फिक्स करतात व त्यांना प्रत्येक नो बॉलसाठी 20 ते 25 हजार रुपये दिले जातात. याशिवाय या वृत्तपत्राने एक व्हिडियो टेपही जाहीर केला होता. ज्यात हमीदने अनेक खळबळजनक वक्तव्य केले होते.
हमीदने रविवारी रात्री आपली बाजू मांडली की, या पुर्ण प्रकरणाला 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' ने चुकीच्या पध्दतीने मांडले आहे. हे प्रकरण 30 ऑगस्ट 2010 च्या संध्याकाळचे आहे. त्यावेळी मी आपल्या एका मित्रासोबत जेवण करत होतो. त्यावेळी एक व्यक्ती आला व त्याने आपले नाव आबिद खान सांगितले. त्याने एहतियाद एयरवेजसोबत माझा एक करार करून देण्याविषयी सांगितले. नंतर कळाले की तो मजहर महमूद ('न्यूज ऑफ द वर्ल्ड' चा रिपोर्टर) होता.
तो म्हणाला की, आबिदसोबत चर्चा करण्यास मी इच्छूक होतो कारण की प्रायोजकत्त्वाशी संबंधित हे प्रकरण होते. त्याने या करारासाठी मला 50,000 पाँड देण्याची तयारी दाखविली.यानंतर त्याने सध्या सुरु असलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणावर बोलणे सुरु केले. मला तो मित्रासारखा वाटल्याने मी त्याच्या प्रश्नांची उत्तरे देणे सुरु केले.
हमीद म्हणाला की, माझ्या आठवणीप्रमाणे मी त्याच्याशी त्याच गोष्टी बोललो ज्या या दिवसात वर्तमानपत्रातून छापून येत आहेत. मला असे वाटते की, त्याच्याकडे गुप्त कॅमेरा होता व मला त्याची जराशीही कल्पना नव्हती.
त्याचाशी बोलल्यानंतर मी हॉटेलात परतलो. दोन दिवसांनतर त्याचा दूरध्वनी आला की, मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या तीन पाकिस्तानी खेळाडूंच्या विरोधात वक्तव्य करण्याकरिता 25 हजार पाँड देण्याविषयी सांगू लागला, मी त्याला नकार देत तात्काळ दूरध्वनी बंद केला.
Add comment