Sports
Tuesday, 07 September 2010 22:13
रोजारियो, 6 सप्टेंबर (पीएसआय)
अजर्ेंटीनामध्ये खेळल्या जात असलेल्या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत अखेर भारतीय संघाने पहिला विजय मिळवला. संघाने रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात जपानचा 2-0 गोलने पराभव केला.
मध्यंतरापर्यंत भारतीय संघ 1-0 ने पुढे होता. चौथ्या प्रयत्नानंतर भारताच्या नशिबी हा विजय आला. भारत आपल्या पहिल्या लढतीत हॉलंडकडून 1-7 ने , दुसऱ्या लढतीत ऑस्टे्रलियाकडून 3-6 ने तर तिसऱ्या लढतीत जर्मनीकडून 1-4 ने पराभूत झाला होता.
भारताने हा विजय मिळवलेला असला तरी विजेतेपदाच्या स्पर्धेतून तो बाहेर पडलेला आहे. भारताचा पुढील सामना सात सप्टेंबरला न्यूझीलंडसोबत होणार आहे. हा भारताचा शेवटचा सामना असेल.
रविवारीं खेळल्या गेलेल्या अ गटातील अन्य लढतीत हॉलंडने जर्मनीचा 2-1 ने पराभव केला. मध्यंतरापर्यंत विजेता संघ 0-1 ने पिछाडीवर होता. याशिवाय याच दिवशी ऑस्टे्रलियाने न्यूझीलंडला 4-1 ने हरविले. मध्यंतरापर्यंत हे दोन्ही संघ 1-1 गोलनी बरोबरीत होते.
जपानवर मिळवलेल्या विजयाने भारतीय संघाला अ गटातील क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचवले आहे. त्याचे तीन गुण आहेत. तर हॉलंडने चार सामन्यात विजय मिळवत 12 गुण मिळवले आहेत. जर्मनीने चार सामन्यात विजय मिळवत 9 गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.
ऑस्टे्रलियाच्या संघानेही 9 गूण मिळवले असून जपान व न्यूझीलंड संघाने प्रत्येकी एक गुण मिळवला आहे. ब गटात अजर्ेंटीना 12 गुणांसह पहिल्या तर इंग्लंड 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Add comment