Sports
Tuesday, 07 September 2010 22:13
इस्लामाबाद, 6 सप्टेंबर (पीएसआय)
पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील असल्याचे आरोप होत असताना पाकिस्तानी सरकारनेही कडक धोरण अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार सरकारने सर्व पाकिस्तानी खेळाडूंच्या बँक खात्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. फॅडरल ब्युरो ऑफ रिव्हेन्यू या खेळाडूंच्या बँक खात्यांची तपासणी करेल.
हा तपास केवळ खेळाडूपुरता मर्यादित नसून पाक क्रिकेट संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक तसेच पाक क्रिकेट मंडळाचे अनेक अधिकारी व निवड समिती सदस्यांच्या बँक खात्यांचीही तपासणी केली जाणार आहे.
दुसरीकडे हे वृत्त आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ऍन्टी करप्शन यूनिट यासिर हमीदची चौकशी करणार आहे. हमीदने पाकिस्तानचे जवळपास प्रत्येक सामने फिक्स असतात, असा आरोप केला होता.
Add comment