Sports
Wednesday, 18 February 2009 22:42
ढाका, 18 फेब्रुवारी (पीएसआय)
2011 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्या यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उद्धाटन सोहळा बांगलादेशात होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) सांगितले आहे.
बांगलादेशचे वृत्तपत्र 'डेली स्टार'नुसार आयसीसीने उद्धाटन सोहळयासाठी 19 फेब्रुवारी, 2011 ही तारीख निश्चित केली आहे.
वृत्तपत्रानुसार, 2011 विश्वचषकाचा पहिला सामनाही बांगलादेशमध्येच खेळला जाईल. वृत्तपत्राने आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारुन लोगार्ट यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की ''आम्ही बांगलादेशला 2011 विश्वचषकाचा उद्धाटन सोहळा आणि पहिल्या सामन्याचे यजमानपद देण्याचा निर्णय घेतला आहे.''
सोबतच, आयसीसीने विश्वचषकाचा कालावधी थोडा संक्षिप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा कालावधी सहा ते सात आठवडयांदरम्यान असेल.
उल्लेखनीय म्हणजे, 2007 मध्ये वेस्टइंडीजमध्ये आयोजित गेल्या विश्वचषकाचा कालावधी एवढा जास्त होता की प्रेक्षकांनी मैदानाकडे फिरकणेच सोडून दिले होते. आयसीसीने तेव्हापासून रोमांच कायम ठेवण्यासाठी विश्वचषकाचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न चालवला होता.
Add comment