मुंबई,30 डिसेंबर (पीएसआय)
29 डिसेंबरला बॉलीवुडचा पहिला सुपर स्टार राजेश खन्ना 69 वर्षाचे झाले. बॉलीवुडसहित पुर्ण देशातील लोकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिली व सांगितले की, ईश्वरांनी त्यांना सुखरूप ठेवावे. आपल्या चित्रपटाच्या आयुष्यात एक पेक्षा एक चांगले चित्रपट देणारे अभिनेता राजेश खन्ना आपल्या वैयक्तिक आयुष्यात खुप रंगीन अंदाजाने प्रसिध्द आहेत.
तुम्हाला जाणुन आश्चर्य वाटेल की, अभिनेता राजेश खन्नाला आपल्या आयुष्यात कथित रूपाने तीनदा प्रेम झाले. म्हणतात की, ज्यावेळी बॉलीवुडमध्ये राजेश खन्ना प्रसिध्द होते त्यावेळी राजेशच्या आयुष्यात एक महिला आली होती जी खुप सुंदर व हुशार होती, ती होती टीव्हीची प्रसिध्द अभिनेत्री अंजू महेन्द्रू. 1960 पासून 1976 पर्यंत राजेश व अंजूचे संबंध कायम राहिले, दोघे एकमेकांच्या प्रेमात व्यस्त राहिले परंतु अचानक त्यांच्यात काय झाले की, दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले व सात वर्ष जुने संबंध तुटले.
त्यानंतर चित्रपट बॉबीने चित्रपट जगात क्रांती आणणारी 16 वर्षिय अभिनेत्री डिंपल कपाडिया राजेश खन्नाच्या आयुष्यात बहार बनुन आली, दोघांनी आपल्या प्रेमाची सुंदर अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले. दोघांनी विवाह केला दोघांच्या वयात खुप अंतर होते. राजेश खन्नाची इच्छा नव्हती की, डिंपलने चित्रपटात काम करावे जे कारण बनले दोघांचे संबंध समाप्त करण्याचे जे दहा वर्षानंतर तुटले. दोघांना विवाहाने दोन मुली झाल्या जिचे नाव टिंवकल व रिंकी आहे.
डिपंल गेल्यानंतर राजेश खन्नाच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाचे अंकुर फुटले यावेळी त्याचे मन बॉलीवुडमध्ये पाय टाकण्याचा प्रयत्न करताना अभिनेत्री टीना मुनीमवर पडली. जिच्यासोबत राजेश खन्नाने सावन कुमारच्या दिग्दर्शनात सुपर डूपर हिट चित्रपट सौतन दिले होते. परंतु हे संबंध पुर्ण होऊ शकले नाही, टीनाची कारकीर्द चित्रपटात जास्त वेळ टिकु शकली नाही त्यामुळे टीनाने विदेश जाऊन आपले शिक्षण करण्याचा विचार केला व ती चित्रपट जग मध्येच सोडून विदेशला गेली व जेव्हा ती परतली तेव्हा ती खुप परिपक्व झाली होती. तिने प्रसिध्द उद्योगपती अनिल अंबानीशी विवाह केला. व तिसऱ्यांदा राजेश खन्ना आपल्या जगात एकटे राहिले.
परंतु आजही त्यांच्याविषयी सांगितल्या जाते की, त्यांना वयाच्या या टप्प्यावर अनीता आडवाणीच्या रूपात पुन्हा कोणी भेटले आहे. जी की, एक बिजनेस वूमन आहे व फिलीपिंसचे माजी राष्ट्रपतींची भाची सांगितल्या जात आहे. परंतु राजेश साहेबांचे म्हणणे आहे की, त्यांना विवाह करायचा नाही ते आपल्या या संबंधावर खुप आनंदी आहेत.