मुंबई,29 डिसेंबर (पीएसआय)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या 100 व्या शतकाची अनेक चाहत्यांना उत्सुक्ता आहे. परंतु त्याच्या अगोदर त्याच्या बंगल्याने शतक ठोकले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, सचिनने आपल्या बंगल्याचा 100 कोटीचा वीमा उतरवला आहे.
सचिनचा बंगला मुंबईतील बांद्राच्या पेरी क्रॉस रोडवर आहे. बंगल्याचा वीमा दोन भागत काढण्यात आला आहे. ज्यात 75 कोटी फायर इन्शूरन्स पॉलिसी आहे. आग, दहशतवादी हल्ला आणि भूकंपासारख्या संकटांचा वीमा काढण्यात आला आहे. तर घराच्या आत ठेवलेल्या वस्तुंचा 25 कोटींचा वीमा आहे.
सांगण्यात येत आहे की, 100 कोटीच्या वीम्यासाठी सचिन 40 ते 50 लाख महिन्याला भरणार आहे. आयपीएल-4 सत्रात सचिनने सर्वाधिक 44 कोटीचा वीमा काढला होता.