नागपुर,25 डिसेंबर (पीएसआय)
देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक शिर्डी साई मंदिराच्या खजिन्यात सतत वाढ होत आहे. 31 मार्च, 2011 ला समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात मंदिराकडून फिक्स्ड डिपॉजिट व बाँडद्वारे बँकेत पाचशे कोटी रुपये पेक्षा जास्त गुंतवणुक करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेत आताच प्रस्तुत मंदिराच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली.
अहवालानुसार, कोटयावधी भाविकांच्या श्रध्देचे केंद्र शिर्डी साई मंदिराकडून गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळया राष्ट्रीयकृत बँकेत 466 कोटी रुपये फिक्स्ड डिपॉजिट करण्यात आले. इतकेच नव्हे तर या कालावधीत मंदिराने शेतकरी विकास पत्रात 40.84 कोटी व सरकारी बाँडमध्ये अंदाजे 22 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. अहवालानुसार इतकी नगद असण्याच्या व्यतिरिक्त मंदिराकडे 28 कोटी रुपयाचे सोने व चार कोटी रुपयाची चांदी आहे.