मुंबई, 16 डिसेंबर (पीएसआय)
छोटया पडद्यावरील रियलिटी शो बिग बॉस-सीजन 5 मधील स्पर्धक असलेली पोर्न स्टार सनी लियोनची सलमान खानबरोबर चित्रपटात काम करण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
शोचा सहयजमान सलमान तिला घेऊन चित्रपट काढण्याची योजना आखत आहे. बिग बॉसच्या घरात सनीला महेश भट्ट यांनी जिस्म-2 मधील प्रमुख भूमिकेचा प्रस्ताव दिल्यानंतर सल्लूमियाची भारतीय वंशाच्या कॅनडीयन सुंदरीवर नजर आहे. सलमानला सनी पोर्न स्टार असण्याशी देणे घेणे नाही. तीदेखील एक माणूस असून लोक विविध क्षेत्रात काम करतात.
त्याआधी सनीनेदेखील सलमानबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अर्थात, दबंग सलमानने आपल्या 'शेर खान' चित्रपटासाठी विदेशी बाला ऍंजेला जॉनसनला शब्द दिला आहे. मात्र आता त्याचा इरादा बदलला असल्याचे दिसते.