रीवा,17 फेब्रुवारी (पीएसआय)
मध्य प्रदेशात लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका इंजिनिअरच्या ठिकाण्यांवर छापे मारले. यात इंजिनिअरकडे कोटयवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे.
लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रीवाच्या बाण सागर प्रकल्पातील कार्यकारी अभियंता महेंद्र यादव याच्या रीवा व भोपाळ येथील ठिकाणांवर छापे मारले. प्राथमिक तपासात यादवकडे कोटयवधी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस अधीक्षक मिथिलेश शुक्ल यांनी सांगितले की, यादवकडे रीवा, भोपाळ, ग्वालियर, शिवपुरीसहित नोएडामध्येदेखील घर असल्याची माहिती मिळाली आहे. यादवची एकूण संपत्ती किती याची तपशील गोळा केला जात आहे.