National
Tuesday, 07 September 2010 22:13
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर (पीएसआय)
इशरत जहाँ चकमक प्रकरणाच्या चौकशीसाठी गुजरात उच्च न्यायालय कोणत्याही संस्थेला नियुक्त करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.
विशेष चौकशी दल (एसआयटी) प्रमुख आर.के. राघवन यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गठित केलल्या एसआयटीला गुजरात उच्च न्यायलयाने या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाने सोमवारी गुजरात सरकारच्या वतीने दाखला करण्यात आलेल्या याचिकेवरही एक नोटिस बजावली. या याचिकेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. इशरत प्रकरणात मुख्य महानगरदंडाधिकारी एस.सी. तमांग यांचा अहवाल आपल्या अधिकार कक्षेत येत असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता.
उच्च न्यायालयाने तमांग यांच्या अहवालाला राज्य सरकारच्या वतीने आव्हान दिल्यानंतर हा निर्णय दिला होता. तमांग यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका ठेवला आहे.
Add comment