National
Tuesday, 07 September 2010 22:13
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर (पीएसआय)
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकार आणि काँग्रेस यांच्यात ताळमेळ कमी होत असल्याच्या अटकळी फेटाळून लावत विचारांत मतभेद असणे यात काही वाईट नाही. सध्याच सेवानिवृत्त होण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
सिंग यांनी सोमवारी आपल्या निवासस्थानी संपादकांच्या एक गटाशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, सध्या सेवानिवृत्त होण्याचा आपल्या मनात विचार नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचेदेखील संकेत दिले. हिवाळी अधिवेशन सात नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
पंतप्रधान म्हणाले, सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री आणि पक्षनेते यांच्यात मतभिन्नता असणे यात गैर काही नाही. लोकशाहीत विचारांत मतभेद असतात. एका मर्यादेपर्यंत सामंजस्याने सरकारच्या कामकाजासाठी ते आवश्यकदेखील आहे.
आपल्या मंत्रिमंडळाने जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळापेक्षा जास्त ताळमेळ राखून काम केले आहे, असा दावाही पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले, नेहरू आणि तत्कालीन उपपंतप्रधान सरदार पटेल यांच्यात जवळपास रोजच पत्रांची देवाण घेवाण होत असे.
इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यातील मतभेदांचा हवाला देत विचारांतील मतभिन्नता वाईट नसते, असे पंतप्रधान सिंग यांनी सांगितले.
Add comment