National
Tuesday, 07 September 2010 22:13
नवी दिल्ली,6 सप्टेंबर (पीएसआय)
सर्वोच्च न्यायालयाने अहमदाबाद येथील अक्षरधाम मंदिरावर 2002 साली झालेल्या हल्ल्यातील तीन दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला सोमवारी स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती बी.सूदर्शन रेड्डी, न्यायमूर्ती एस निज्जर यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली. न्यायालयने तिघांच्या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात सरकारला नोटीसही बजावली आहे.
याचिकेमध्ये दोषी तिघांनी घटनेची पूर्ण चौकशी केंद्रिय अन्वेषण विभागा (सीबीआय) मार्फत करण्याची मागणी केली. या तिघांव्यतिरिक्त या प्रकरणात दोन इतर लोकांच्या शिक्षा थांबवण्यात आली आहे. यापैकी एकाला जन्मठेप एकाला दहा वर्ष शिक्षा सुनावली आहे.
Add comment