National
Tuesday, 07 September 2010 22:13
रतलाम, 6 सप्टेंबर (पीएसआय)
मध्ये प्रदेश येथील रतलाम जिल्ह्यातील उसळलेल्या हिंसाचारानंतर लावण्यात आलेली संचारबदी सोमवारी दोन तासासाठी शिथील करण्यात आली. यावेळी नागरिकांनी आवश्यक सामानांची खरेदी केली.
शुक्रवारी रात्री एका धार्मिक स्थळावर शेण पेफ्कण्यात आल्याच्या घटनेने हिंसाचार उसळला होता. परिस्थिती नियत्रणाबाहेर जात असल्यामुळे प्रशासनाने माणक चौक, स्टेशनरोड या भागातील काही ठिकाणी संचारबंदी लावली होती.सोमवारीदेखील संचारबंदी कायम होती.
रतलामचे पोलिस अधीक्षक मयंक जैन यांनी सोमवारी सांगीतले की संचारबादीमध्ये सकाळी आठ ते दहा अशी दोन तासांची सुट देण्यात आली. यावेळी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात राहिली. सायंकाळीही संचारबंदीत शिथिल करण्यात येईल. तसेच संचारबंदी असलेल्या भागात सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली जात असून पोलिसांची गस्त सुरू आहे.
Add comment