National
Tuesday, 07 September 2010 22:13
नवी दिल्ली , 6 सप्टेंबर (पीएसआय)
पवन हंस हेलीकॉप्टर लिमिटेड (पीएचएचएल) कडून रोहिणीमध्ये उभारण्यात येत असलेला दिल्लीचा पहिला विशाल हेलिपोर्ट व राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खेलगावात बनविण्यात येत असलेला हेलिपॅड सप्टेंबर महिन्याच्या मध्यामध्ये कार्यान्वित होईल.
पीएचएचएलने सांगितले की, या क्रीडा स्पर्धानंतर या हेलिपोर्टचा वापर दिल्ली व त्याच्या जवळील भागातील हेलिकॉप्टर सेवेसाठी केला जाईल. या माध्यमातून वाहतूक व पर्यटन क्षेत्राला चालना देत आर्थिक उत्पन्नही मिळवण्यात येईल.
पीएचएचएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. के. त्यागी हे म्हणाले की, क्रीडा स्पर्धांसाठी खेलगावमधील हेलिपॅड उभारण्याचे काम जवळपास पुर्ण झाले असून त्याचे थोडेसे काम बाकी आहे. सोबतच रोहिणीमध्ये दिल्लीचा पहिला हेलिपोर्ट 15 सप्टेंबरपर्यंत कार्य करणे सुरु करेल.
दिल्ली सरकार व उड्डयन मंत्रालयाने 2009 मध्ये दिल्लीत हेलिपॅड व हेलिपोर्ट बनविण्याचा निर्णय घेतला होता.
त्यागींनी सांगितले की, हेलिपॅड व हेलिपोर्ट सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होतील. आम्ही स्पर्धेसाठी त्यांचा वापर करू. हेलिकॉप्टर रोहिणीमध्ये उभे केले जातील व गरजेप्रमाणे मान्यवरांना आयोजन स्थळापर्यंत आणण्या नेण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाईल.
पीएचएचएलने रोहिणीमध्ये हेलिपोर्टसाठी जवळपास 25 एकर जमिनीच्या अधिग्रहणासाठी 19.5 कोटी रुपये खर्च केले आहेत सोबतच हेलिपोर्ट उभारण्यासाठी जवळपास 45 कोटी रुपये खर्च केले आहेत.
Add comment