National
Tuesday, 07 September 2010 22:13
नवी दिल्ली,6 सप्टेंबर (पीएसआय)
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी 7 नोव्हेंबरपासुन सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापुर्वी या फेरबदलांचे संकेत दिले आहेत. मानले जात आहे की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनापुर्वी अनेक मंत्र्यांचे पद काढले जाऊ शकते, तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो. पंतप्रधानांनी कॅबिनेटचे सरासरी वय कमी करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, गेल्या काही काळापासून जवळपास सर्वच मंत्रालयाच्या कामकाजाविषयी टीका होत आहे. विशेषत: कृषी व अन्न पुरवठा, परराष्ट्र मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय सतत वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची स्थिती आहे. अन्नधान्य सडण्याच्या प्रकरणात न्यायालयाकडून फटकारण्यासह परराष्ट्र धोरणांविषयीच्या डळमळीतपणामुळे सरकारमध्येच किरकिर होत आहे. स्वत: पंतप्रधान या प्रकरणाविषयी गंभीर असल्याचे दिसत आहे.
रेल्वे मंत्रालयाविषयीही डॉ. मनमोहनसिंग कठोर भूमिका घेऊ शकतात. शरद पवार यांच्या हातातून कृषीमंत्रीपदही जाण्याचे संकेत मिळत आहेत. पवारांनीही या मंत्रालयाच्या काही घटकांचा कार्यभार दुसऱ्या कुणाला सोपविण्याची विनंती पंतप्रधानांकडे केलेली आहे. याचप्रकारे रेल्वे मंत्रालयाचा कारभार एकटयाने पहात असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या मदतीसाठी अजून एक राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय पक्षातल्या तरुणांना वाव देण्याच्या धोरणाला या फेरबदलाच्या माध्यमातुन प्रत्यक्षात आणले जाऊ शकते. पंतप्रधानांनी आज सांगितले की, पर्यावरणाविषयीची चिंता मांडत इतका गोंधळ घालण्याची गरज नाही की त्यामुळे औद्योगिक विकासच ठप्प होईल. ते म्हणाले की, पर्यावरण व विकास हे सोबत चालू शकतात. गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्या कामकाजाची त्यांनी प्रशंसा केली. सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या धोरणात्मक कार्यात हस्तक्षेप करायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Add comment