National
Thursday, 26 February 2009 22:04
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी (पीएसआय)
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट देत महागाई भत्त्यात सहा टक्के वाढीची घोषणा केली आहे. कॅबिनेटच्या आज झालेल्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 16 टक्क्यांहून वाढवून 22 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.
सरकारच्या या निर्णयाने त्यांच्यावर 5159 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल. सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात बराच फरक पडेल. महागाई भत्त्याचा फायदा फक्त सध्याच्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार नाही, तर निवृत्त कर्मचारीही याचा फायदा उचलू शकतील. महागाई भत्त्यात ही वाढ जानेवारी 2009 पासून लागू केली जाईल. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी मंगळवारी सर्व्हिस टॅक्स आणि एक्साइज डयूटीमध्ये दोन टक्क्यांपर्यंतची कपात करुन एक मोठा दिलासा दिला होता.
Add comment