नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी (पीएसआय)
रद्द करण्यात आलेल्या परवाने वाटण्याच्या प्रक्रियेत आपल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागल्यानंतर पुन्हा एकदा ट्रायने स्पेक्ट्रम वाटप धोरण आखण्याचे काम सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भारतीय दूरसंचार नियामक (ट्राय)विरोधी टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर आता ट्रायसाठी हे काम जास्त आव्हानात्मक असेल. नव्याने होणाऱ्या स्पेक्ट्रम वितरणाची प्रक्रियेत ट्रायपुढे सर्वात मोठा प्रश्न वितरणातील पारदर्शकता आणि किंमत निश्चितीचा आहे.