International
Monday, 23 February 2009 13:58
न्यूयॉर्क, 23 फेब्रुवारी (पीएसआय)
अत्यंत उत्कंठा लागलेल्या ऑॅस्कर पुरस्कार सोहळयात अपेक्षेप्रमाणे 'स्लमडॉग मिलिनियर'ने बाजी मारली असून या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह आठ पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांना दोन ऑॅस्कर मिळवून इतिहास घडविला आहे. स्लमडॉगला दहा विभागात नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी दोन नामांकने होती. म्हणजे एकूण दहा नामांकनापैकी आठ पुरस्कार मिळाले आहेत.
स्लमडॉगला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजिनल स्कोर), सर्वोत्कृष्ट गीत, उत्कृष्ट पटकथा, छायाचित्रण, ध्वनी मिश्रण, एडिटिंग या विभागात ऑॅस्कर मिळाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनाही पहिल्यांदाच ऑॅस्कर मिळाले आहे. याशिवाय भारतातील एक ग्रामीण भागातील पिंकी या मुलीवर आधारीत पिंकी या लघुपटालाही सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंटरीचे ऑॅस्कर मिळाले आहे.
सीन पेन यांना मिल्कमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, केट विन्स्लेट हिला द रिडर मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हिथ लेजर व पेनेलोप क्रुझ हे सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री ठरले.
ऑॅस्करच्या सोहळयात आज स्लमडॉगमधील दोन गाणीही स्टेजवर सादर करण्यात आली. ऑॅस्करच्या रंगमंचावर पहिल्यांदाच हिंदी गाणी सादर झाली असावीत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑॅस्कर जाहीर झाल्यानंतर निर्मात्यासह देव पटेल, फ्रीडा पिंटो, अनिल कपूर, इरफान खानसह इतर कलावंत व चित्रपटाचा क्रू उपस्थित होता.
सत्यजीत राय आणि भानू अथय्या यांच्यानंतर हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारा रेहहमान हा तिसरा भारतीय ठरला. 1992 मध्ये सत्यजीत राय यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर 1983 मध्ये गांधी सिनेमाच्या कॉश्च्युम डिझायनिंगसाठी भानू अथय्या यांना ऑॅस्कर पुरस्कार मिळाला होता.
पण या दोन पुरस्कारांव्यतिरिक्त ऑॅस्करची बाहुली भारतापासून दूरच राहिली. पण यावर्षी हा दुष्काळ संपला आहे. डॅनी बोएलचा स्लमडॉग मिलिनिअर हा भारतीय चित्रपट नसला तरी तो पूर्णपणे मुंबईची कथा सांगतो. त्यातील कलाकार, तत्रंज्ञ, संगीत हे सारे सारे भारतीय होते. म्हणूनच स्लमडॉग हा कुणाही भारतीयासाठी परका सिनेमा वाटत नाही.
मुंबई शहरातल्या झोपडपट्टीतल्या मुलाची ही लवस्टोरी. खरं तर लवस्टोरी अशा एका फॉरमॅटमधे बसवणं चूकच. पण दिग्दर्शकाच्या नजरेतून पाहिले तर ही लवस्टोरीच. लतिका आणि जमाल यांच्याभोवतलाचं जग. या साऱ्यातून डॅनी मुंबईची ही गोष्ट सांगत जातो आणि रेहमानचे संगीत ही गोष्ट तुमच्या हृदयापर्यंत पोहचवते.
अविश्वसनीय वाटणारे प्रसंग आणि करोडपती होण्यासाठी दिलेली उत्तरं या सगळयापेक्षा महत्त्वाचं आहे ते त्याचं मुंबईशी जोडले जाणं. नावापासून कास्टिंगपर्यंत आणि गरिबी दाखववावी की नाही, या विषयावरही खलबतं झाली. पण काही झाले तरी हा सिनेमा आपला वाटावा, असाच आहे. म्हणूनच या सिनेमाला ऑॅस्कर मिळावं, असं मनापासून वाटत होते.
Add comment