लाहोर,17 फेब्रुवारी (पीएसआय)
पाकिस्तानच्या लाहोर शहरात सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवर धूम्रपान करण्याला बंदी घातली जाणार आहे.
'जियो न्यूज' या वृत्तवाहिनीनुसार तंबाखू नियंत्रण जिल्हा समिती (डीसीटीसी) ने धूम्रपान विरोधी कायदा लागू करून अवघ्या शहरातील सरकारी कार्यालये, आरोगय केंद्रे, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे धूम्रपान मुक्त करण्याची योजना आखली आहे.
समितीचे वरिष्ठ अधिकारी इनामुल हक यांनी संपूर्ण जिल्हयात तंबाखू नियंत्रणाचा कायदा लागू करण्या संबंधीच्या विविध प्रस्तावांचा आढावा घेतला.