दमिश्क,23 जानेवारी (पीएसआय)
सीरियामध्ये राष्ट्रपती बशर अल-असदद्वारे क्षमादानाची घोषणा झाल्यानंतर एकुण 5,255 लोकांना तुरूंगातुन मुक्त करण्यात आले. दुसरीकडे सीरियातील होम्स शहरात रविवारी शस्त्र गटाद्वारे बसवर केलेल्या हल्ल्यात 11 लोक ठार झाले.
वृत्तसंस्था सिन्हुआनुसार राष्ट्रपतींनी देशात पसरलेल्या अशांतीदरम्यान गेल्यावर्षी मार्चपासून आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यासाठी गेल्या आठवडी क्षमादानाची घोषणा केली होती. या क्षमादानमध्ये शांतिपूर्ण पध्दतीने निदर्शने करणारे व लायसन्सशिवाय शस्त्र ठेवणारे आरोपींना समाविष्ट करण्यात आले. या व्यतिरिक्त जे लोक यामहिन्या आखेरपर्यंत आपले गैर लायसन्स शस्त्र सरकारला सोपवतील त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळेल.
याव्यतिरिक्त लष्कराचे पळके जर 31 जानेवारीपूर्वी प्रशासनसमोर येतील तर त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळेल. सीरियाने गेल्यावर्षी मार्चपासून आतापर्यंत 9200 कैदींना क्षमादान अंतर्गत मुक्त केले आहे.
वृत्तसंस्था सिन्हुआने स्थानिक एफएम रेडियोच्या हवाल्याने वृत्त दिले की, बसमध्ये सैन्य कर्मचाऱ्यांसहित 14 लोक बसलेले होते. होम्सचे अल-फखोरामध्ये जेव्हा बस दमिश्कसाठी रवाना होत होती तेव्हा हा हल्ला झाला.