International

काहीरा,22जानेवारी (पीएसआय)
इजिप्तमध्ये राष्ट्रपती हुस्नी मुबारक यांनी पद सोडल्यानंतर झालेल्या पहिल्या संसदीय निवडणुकीत इस्लामी पक्षांना मोठे यश मिळाले आहे. तीन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत मुस्लिम ब्रदरहुडचा राजकीय भाग असलेल्या फ्रीडम ऍंड जस्टिस पार्टी (एफजेपी) ने सर्वात जास्त 40 टक्के जागांवर यश मिळविले आहे. कट्टरपंथी इस्लामी सलाफी अल-नूर पार्टी दुसऱ्या स्थानी आहे.
सालाफी दुसऱ्या क्रमांकावर
उदारवादी न्यू वफाद आणि धर्मनिरपेक्ष इजिप्शियन ब्लॉक आघाडी त्यांच्या मागे आहे. एकूण हाती आलेल्या निकालात इस्लामी पक्षांनी दोन तृतीयांश जागांवर यश मिळवले आहे. द फ्रीडम ऍंड जस्टिस पार्टीने साद अल-खतानी यांना सभापती पदासाठी उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. खतानी मुस्लिम ब्रदरहुडचे दीर्घकाळापासून पदाधिकारी राहिले असून अपक्ष खासदार आहेत.
बीबीसीच्या वृत्तानुसार मुस्लिम ब्रदरहुड सत्तेच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. मात्र सरकार स्थापनेचा निर्णय शासकांनाच घ्यायचा आहे. इजिप्तचे लष्कर शासकांनी ठरविलेल्या मुदतीनुसार जूनपर्यंत नवीन राष्ट्रपतीची निवड करतील. ब्रदरहुडने तीस वर्षे हुस्नी मुबारक यांच्या राजवटीचा विरोध केला आहे.
सलाफी सातव्या शतकात हजरत मोहम्मद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेळी प्रचलित इस्लामच्या धर्तीवर इजिप्त चालवू इच्छिते. त्याआधी इजिप्तच्या जनतेने संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या 489 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत तीन टप्प्यात मतदान केले होते. मतदानाची ही प्रक्रिया सहा आठवडे चालली होती. देशाची निवडप्रक्रियेनुसार दोन तृतीयांश जागा पक्षाच्या उमेदवारांसाठी निश्चित असतात तर उर्वरित जागांसाठी थेट निवडप्रक्रिया आहे.
इजिप्तची निवडणूक प्रक्रिया मार्च 2012 पर्यंत चालणार आहे.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News