खार्तूम, 25 डिसेंबर (पीएसआय)
सुदानच्या सेनेने दारफुरच्या बंडखोर गटाचे प्रमुखास ठार केले आहे. सेनेचे म्हणणे आहे की, खलील इब्राहिम उत्तरी कोर्दोफनमध्ये झालेल्या लढाईत मारले गेले आहेत. मात्र या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आलेली नाही. खलील इब्राहीम संघर्षपूर्ण क्षेत्र दारफूरमध्ये जस्टिस ऍंड इक्वालिटी मुव्हमेंटचे नेते म्हणून ओळखले जात होते. काही महिन्यापूर्वी ते लीबियात गद्दाफी शासनचा खात्मा झाल्यानंतर परतले होते.
सुदानी सेनेचे प्रवत्तेफ् सावरमी खालेद यांनी बीबीसीला सांगितले की, इब्राहिम सकाळी मारला गेला होता. प्रवक्तयाने राज्य टीव्हीला सांगितले की, खलील इब्राहिम आणि इतर काही नेते दक्षिण सुदानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, जो जुलैमध्ये सुदानपासून वेगळा झाला होता.
गद्दाफीची मदत
सुदानने जेईएमवर आरोप केला होता की, त्यांनी गद्दाफीची त्याच्या सत्तेवर मजबूत पकड बनविण्यासाठी त्याची मदत घेतली होती. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, गद्दाफीच्या त्रिपोलीमधील पतनामुळे बंडखोरांना मोठा धक्का बसला होता. कारण ते त्यांना सहारा आणि आर्थिक मदत देत होते.
बंडखोरांनी सुदानच्या सरकारसोबत फेब्रुवारी 2010 मध्ये युध्दविराम करारावर हस्ताक्षर केले होते, परंतु सुदानी सेनेवर दारफूरमध्ये नवीन हल्ल्याचा आरोप करत लवकरात लवकर शांती वार्ता रोकण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राचे म्हणणे आहे की, 2003 साली झालेल्या संघर्षात जवळपास तीन लाख लोक मारले गेले होते.