International
Tuesday, 07 September 2010 22:13
इस्लामाबाद,6 सप्टेंबर (पीएसआय)
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खानने मॅच फिक्सिंगचे हे ताजे प्रकरण व त्यानंतरची परिस्थितीला पाकिस्तान क्रिकेटसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असल्याचे सांगितले आहे.
द डेली टाईम्स या वृत्तपत्राला त्याने सांगितले की, खेळातील या भ्रष्टाचाराच्या परिस्थितीला वेळीच रोकले गेले नाही तर त्यामुळे मोठे नूकसान होईल. कारण यामुळे येणाऱ्या पिढीसमोर चुकीचा संदेश जाईल.
इम्रान म्हणाला की, या घटनेमुळे पाकिस्तानच्या क्रिकेटला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. या वेदना खेळाडूंच्या दाव्यांबरोबरच अजून खोलवर चालल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या या परिस्थितीला रोकण्याची वेळ आली आहे. आपण सगळे मिळून त्याला रोकू शकतो.
इम्रान म्हणाला की, क्रिकेटची देखभाल करणाऱ्या संघटनांनी अंतर्गत वादापासुन वेगळे होत क्रिकेटच्या रक्षणासाठी पावले उचलली पाहिजे. सोबतच यासाठी राष्ट्रपतींसह दुसऱ्या राजकीय नेत्यांनी ही पुढे आले पाहिजे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अंतर्गत वादाच्या बाहेर पडून क्रिकेटचे रक्षण केले पाहिजे. असे झाले नाही तर तो दिवस दूर नाही की पाकिस्तानातच काय तर समस्त जगात पाकिस्तानी आपल्या संघाचा सामना बघायला जाणार नाही.
Add comment