International
Tuesday, 07 September 2010 22:13
यरुशलम, 6 सप्टेंबर (पीएसआय)
इस्रायली अर्थ मंत्रालयाने एक निविदा प्रसिध्द करून विमान कंपन्यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासासाठी वापरात येणाऱ्या 'एयरफोर्स वन' सारख्या विमानाची डिझाईन करण्याचे नमूद केले आहे.
सिन्हुआ ने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने सांगितले की, नवे विमानाचा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी किंवा सरकारी कामांसाठी वापर केला जाईल.
या विमानाला किमान 15 वर्षापर्यंत सेवा बजवावी लागेल व इंधन भरण्यासाठी जमिनीवर येण्यापुर्वी ते किमान 10,000 किलोमीटर अंतर पार करण्यास सक्षम असले पाहिजे.
विमानात वरिष्ठ आधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, एक मल्टीमीडिया कॉन्फरन्स कक्ष, उपग्रह दळणवळण व्यवस्था, मदतनिस व अंगरक्षकांसाठी स्थान त्यात उपलब्ध असेल.
Add comment