International
Thursday, 26 March 2009 22:48
वॉशिंग्टन, 26 मार्च (पीएसआय)
अमेरिकी डाकसेवा प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करीत आहे तसेच त्यांना यावर्षी आर्थिक मदत मिळू लागलेली नाही.
डाकसेवेचे पोस्टमास्टर जनरल जॉन पोट्टर यांनी काँग्रेसला परवानगी मागितली आहे की, डाकसेवेच्या कामकाजाचे दिवस एका सप्ताहात सहा ते पाच दिवस करण्यात यावे.
प्रतिनिधी सभेच्या एका समितीला पोट्टर म्हणाले की, डाकसेवा ऐतिहासिक नुकसानीचा सामना करीत आहे आणि आम्ही कठीण परिस्थितीत आहोत. ते म्हणाले की, गेल्या वर्षी डाक विभागाला 2.8 अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते तसेच या वर्षी त्याही पेक्षा मोठे नुकसान होऊ शकते. सप्ताहात पाच दिवसांच्या कामाने वार्षिक 3.5 अब्ज डॉलरची बचत होऊ शकते.
Add comment