सोने झळाळले
Business
Friday, 20 November 2009 22:10
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (पीएसआय)
सोन्याचे भाव सलग वधारल्याने गुंतवणूकदार गुरुवारी चकीतच झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूतीचा कल व शेअर बाजार घसरल्याने सोने गुरुवारी 17,400 प्रती तोळयावर जाऊन पोहोचले.
बाजार सुत्रांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,153.90 डॉलर प्रती औंसच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याचे वृत्त सराफा बाजारात पसरताच घरेलू बाजारातही सोन्याने विक्रम केला. ते म्हणाले की, काही गुंतवणूकदार शेअर बाजारापेक्षा सोन्याकडे वळताना पाहण्यास मिळाले, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली व तेजीला बळ मिळाले.
आर.के.ज्वेलर्सचे राकेश आनंद यांनी सांगितले की, झटपट नफा कमवण्यासाठी सध्या सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. बाजार सुत्रान्वये, लग्नाचा हंगाम सुरु होताच स्टॉकिस्ट व दागिने निर्मात्यांकडून मागणी वाढल्याने सोने तेजीत आले.
गुरुवारी सोने स्टँडर्डचा भाव 30 रुपयाने वाढून 17,400 रुपये प्रती तोळा, सोन्या दागिने 30 रुपयाने वाढून 17,250 रुपये प्रती तोळयावर पोहोचले. मर्यादित खरेदीमुळे चांदी तयारचा भाव 28,600 रुपये किलोवर स्थिर राहिला.
Add comment