सोने-चांदी घसरले
Business
Tuesday, 17 November 2009 22:01
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (पीएसआय)
आंतरराष्ट्रीय बाजारात मोठया खरेदीच्या अभावात सोने घसरले. स्थानिक सराफा बाजारात शनिवारी सोन्याचा भाव 150 रुपयाने घटून 17 हजार रुपये तोळा झाला. गुरुवारी सोन्याचा भाव आतापर्यंतच्या विक्रमी स्तर 17150 रुपये तोळा झाला होता. चांदी 370 रुपयाने कोसळून 27350 रुपये प्रती किलोवर बंद झाला. शुक्रवारी महागाई विरोधात भाजपाच्या आवाहनावर दिल्लीचा सराफा बाजार बंद होता.
बाजारात सोन्याची मागणी घटल्याने विक्रमी स्तरावरुन खाली आहे. रिझर्व बँकने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणे निधीतून 200 टन सोने खरेदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय व घरेलू बाजारात भाव वधारला होता.
Add comment