'भारत 7 टक्के विकास दर गाठणार'
Business
Tuesday, 17 November 2009 21:59
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (पीएसआय)
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सांगितले आहे की, पुढच्यावर्षी देशाची अर्थव्यवस्था 7 टक्के विकास दर गाठू शकेल. आज 29 व्या भारत-आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाचे (आयआयटीएफ-2009) उद्धाटन करत त्या म्हणाल्या की, जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्थाचा विकास दर 6.5 टक्के राहिला आहे.
यातून आपली अर्थव्यवस्था मजबूत व संकटाचा सामना करण्यास असल्याचे सिध्द होते. त्यांच्यानुसार, आपल्या मजबूत घरेलू बाजार, गतीशील मध्यमवर्गीय लोकसंख्या व उच्च विकास दर या गोष्टी जगात भारताचा आर्थिक प्रभाव वाढत असल्याचे संकेत देतो. भारतात उच्च गुणवत्तेचे उत्पादन व सेवा योग्य दरात पुरवण्याची क्षमता आहे.
त्या म्हणाल्या की, भारतात अनेक आर्थिक फायदे आहे, ज्याचा जग भारतासोबत संलग्न होऊन लाभ घेऊ शकतो. देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात वेगाने काम होत आहे.
आगामी 5 वर्षात यात 550 अब्ज डॉलर गुंतवणूकीची संधी आहे. यंदा व्यापार मेळयात विविध देश व देशभरातील 7 हजारापेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत. मेळयास 25 लाख लोक येण्याची शक्यता आहे.
त्यांनी सांगितले की, मेळयात प्रदर्शित उत्पादन, सेवा व तंत्रज्ञान, कृषी, उद्योग क्षेत्रात भारताची प्रगती आणि क्षमतांचा विश्वसनीय पुरावा आहे. व्यापार मेळा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती प्रसंगी सुरु झाला आहे.
Add comment