व्याजदरात किरकोळ वाढ होण्याची शक्यता
Business
Thursday, 08 October 2009 22:24
मुंबई, 7 ऑक्टोबर (पीएसआय)
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत व्याज दरात किरकोळ वाढ करण्याची शक्यता आहे. एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना या गोष्टीचा उल्लेख केला.
पारेख म्हणाले की, हा संकेत देण्यासाठी सरकार चलनवाढीच्या दबावावरून चिंतित आहे. जानेवारी-मार्च, 2010 च्या तिमाहीत व्याज दरात किरकोळ वाढ होऊ शकते. व्याज दरांत किमान 0.5 टक्क्यांची वाढ होईल.
अर्थात त्यांनी सांगितले होते की, चालू तिमाहीमध्ये व्याज दरात वाढ होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
एचडीएफसीचे प्रमुख पारेख म्हणाले, अर्थव्यवस्थेत सुधारणेबरोबरच उत्पादन कामात वाढ झाली आहे. अशात बँकांच्या ठोक कर्जात वाढ होईल.
वाणिज्य, रीयल एस्टेट क्षेत्रासाठी कर्जात तूर्तास वाढ होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
Add comment