आयएमएफ सोने विकणार
Business
Sunday, 20 September 2009 22:19
वॉशिंग्टन, 19 सप्टेंबर (पीएसआय)
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) आपल्या सुवर्ण भांडारातील आठवा भाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मिळणाऱ्या काही पैशांचा वापर कमी उत्पन्न असणाऱ्या देशांच्या मदतीसाठी केला जाईल.
आरआयए नोवोस्ती वृत्तसंस्थेनुसार, आयएमएफने सांगितले की, बोर्डने 403.3 मेट्रिक टन सोने विकण्यास मंजूरी दिली आहे. यामुळे 186 सदस्य देशांच्या आर्थिक संस्थेची आपल्या खर्चासाठी कर्ज महसुलावरील निर्भरता कमी होईल.
आयएमएफनुसार, सोने विकून मिळणारे काही पैसे कमी उत्पन्नवाल्या देशांना सवलत कर्जाच्या रुपात दिले जातील. संस्था सोने विकताना आंतरराष्ट्रीय सुवर्ण बाजारावर परिणाम होणार नाही याची काळजी घेईल.
आयएमएफचे व्यवस्थापकीय संचालक डोमिनिक स्ट्रास-कान यांनी सांगितले की, कार्यकारी बोर्डने गरीब देशांना सवलतीच्या दरात कर्ज देण्यात आयएमएफला आणखी मजबूत करण्यासाठी सोने विक्री प्रस्तावाला मान्यता दिल्याने मी खुश आहे.
Add comment