दिवाळीपर्यंत सोने आणखी झळाळणार
Business
Monday, 14 September 2009 22:28
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (पीएसआय)
सोन्याचे भाव आणखी वाढण्याची लक्षणं दिसत आहेत. देशातील प्रमुख उद्योग संघटना एसोचैमनुसार, दिवाळीपर्यंत सोने 18 हजार रुपये तोळा पर्यंत जाऊ शकते.
शनिवारी दिल्लीत सोन्याचा भाव 16 हजार 70 रुपये तोळा होता. एसोचैमने सांगितले की, सोन्याचा भाव दिवाळीपर्यंत 2 हजार रुपयाने वाढू शकतो. दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम आहे व यात मागणी व भाव दोन्ही वाढतील. संघटनेचे अध्यक्ष सज्जन जिंदल म्हणाले की, शेअर्सचे वधारलेले भाव व यात गुंतवणूकीचे जोखिम जास्त असल्यामुळे गुंतवणूकदारांना सोने आकर्षित करत आहे.
Add comment