Business

नवी दिल्ली,28 डिसेंबर (पीएसआय)
देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच आपण देश सोडून कुठे जाणार नाही, असे सांगून सर्वांना खूश केले आहे, परंतु जास्तीत संख्येने उद्योगपती यावर विश्वास ठेवत नाहीत. देशाच्या सध्याच्या स्थितीवर ते एवढे नाराज आहे की, लवकरात लवकर आपले सामान घेऊन येथून निघून जाऊ इच्छित आहेत. त्यांच्या नाराजगीचे सर्वात मोठे कारण भ्रष्टाचार आणि लालफीतशाही आहे. उद्योग जगताची ही नाराजगी नक्कीच देशाला महागात पडू शकते.
पीरामल समूहाचे प्रमुख अजय पीरामल अब्जावधी संपत्तीचे मालक आहेत, परंतु या संपत्तीचे काय करायचे, याविषयी त्रस्त आहे. अजय पुढे म्हणाले, देशात संधीची कसलीही कमतरता नाही, परंतु मोठी गुंतवणूक करायचे म्हटले तर अडथळेच अडथळे आहेत. कोठेही पारदर्शकता नाही. चीनमध्ये जे संयंत्र लावायचे त्यास दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. अजय म्हणाले, मलाही हा देश खूप आवडतो, परंतु त्याचे ग्राहक याची वाट पाहू शकणार नाहीत.
गतीमान अर्थिक विकासामुळे भारत जगभरात नावारुपास येत आहे. यामुळे गुंतवणुकीचे केंद्र होण्याऐवजी गुंतवणूकदार येथून स्थलांतरीत होत आहे. केंद्रीय बँकेच्या आकडेवारीवरुन हे सिध्द होते की, 2010 च्या सुरुवातीस भारतीय उद्योगपतींची विदेशातील गुंतवणुकीचे आकडे विदेशींच्या येथे होणाऱ्या गुंतवणूकीस पार करुन गेले आहेत. भारतीयांनी 2010 मध्ये विदेशात जवळपास 40 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही विदेशी गुंतवणूक येथे केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पटीने आहे.
भ्रष्टाचार, राजकीय निरुत्साह, योजनांना मंजुरीस उशीर, नियमांचे अडथळे आणि भूमि अधिकग्रहणसारख्या समस्या भारतीय उद्योगपतींसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे. ते भलेही संपत्तीच्या शिखरावर बसले असतील, परंतु अपयश या देशासाठी खराब आहे, जो विकासाच्या रथावर स्वार झाला आहे. रस्ते, वीज, पाणी, गोदाम आदींची सक्त गरज आहे. गोदरेज समुहाचे चेयअरमन जमशेद गोदरेज यांच्यामते, जर भारतात आपण इमानदार व्यावसायिक आहात तर व्यवसाय सुरु करण्यास येथे मोठी अडचण आहे.
राजकीय दबावामुळे मल्टी ब्रँड रिटेलमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीस थंड बस्त्यात गुंडाळून ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आदित्य बिर्ला गु्रपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला चांगलेच संतापले होते. एवढेच नाही तर ज्यादिवशी निर्णय झाला, त्याच दिवशी ते म्हणाले होते, महत्त्वाचे हेच आहे की आता आम्ही परदेशात संधी शोधायला हव्यात.

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News