Business
Tuesday, 08 March 2011 21:40
नवी दिल्ली,6 मार्च (पीएसआय)
देशात एप्रिलपासुन डिसेंबर, 2010-11 मध्ये आलेले एकुण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुक (एफडीआय) मध्ये अंदाजे 50 टक्के भाग महाराष्ट्र व दिल्ली-एनसीआरच्या झोळीत पडले.
उद्योग मंत्रालयाचे ताजा आकडेवारीनुसार या कालावधी दरम्यान महाराष्ट्रात सर्वात जास्त 5.24 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणुक झाली, जी एकुण एफडीआयचे 35 टक्के आहे.
याप्रकारे दिल्ली व एनसीआर (उत्तर प्रदेश व हरयाणाच्या काही क्षेत्रात) 2.16 अब्ज डालरची विदेशी गुंतवणुक झाली. एनसीआरला एकुण विदेशी गुंतवणुकीचे 19 टक्के प्राप्त झाले.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र व एनसीआरमध्ये एफडीआय वाढण्याचे मुख्य कारण हे आहे की, या क्षेत्रात आधारभुत आराखडयात खुप विकास झालेला आहे.
या दरम्यान एफडीआय मिळण्यात कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटकला 1.12 अब्ज डॉलरचे एफडीआय मिळाले. यानंतर आंध्रप्रदेशला 1. 04 अब्ज डॉलर, गुजरातला 42.7 कोटी डॉलर आणि गोवाला 30 कोटी डॉलरचे विदेशी गुंतवणुक मिळाली.
Add comment