Business
Tuesday, 08 March 2011 21:37
लंडन, 5 मार्च (पीएसआय)
तेल व्यापारी राहिलेले ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री ऍलेन डंकन यांनी शनिवारी इशारा दिला आहे की जर अरब राष्ट्रांमध्ये अशांतता वाढली तर जागतिक बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती दुप्पट होऊ शकतात. डंकन यांना खाडी देशामध्ये व्यवसाय करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी टाईम्स वृत्तपत्राला सांगितले की, कच्चा तेलाच्या किंमती 200 डॉलर (140 यूरो) प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात. जूलै 2008 मध्ये किंमती 147 डॉलरपर्यंत गेलेल्या होत्या, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. डंकन म्हणाले की, जर बंडखोरांनी अरब भागातील तेलसाठे आणि सौदी अरबमधील राखीव साठे आणि पाईपलाईन बॉम्बने उडविणे सुरु केल्यास कच्चा तेलाच्या किंमती 250 डॉलर प्रती बॅरलपर्यंत जाऊ शकतात.
टाईम्सच्या विश्लेषकांचा हवाला देत म्हटले की, कच्चा तेलाच्या बाजारपेठेतील अशी वाढ ब्रिटनमध्ये आणखी एका मंदीला जन्म देऊ शकते.
Add comment