Business
Thursday, 03 March 2011 23:29
नवी दिल्ली,2 मार्च (पीएसआय)
आज कांदा निर्यातदारांना जास्त सुट देऊन सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य (एमईपी) एकचतुर्थांश कमी करून 450 डॉलर प्रती टन केले.
यापुर्वी याच्या निर्यातची परवानगी देऊन ही अट ठेवली होती की, देशातुन 600 डॉलरपेक्षा कमी मूल्याने कांदा निर्यात केल्या जाऊ शकत नाही. विदेशी व्यापार महासंचालकाच्या अधिसूचनेत कांद्याचे किमान निर्यात मूल्य घटवले आहे. महानिदेशालयाच्या वक्तव्यात सांगितले की, बंगळुरू दररोज आणि कृष्णापुरम कांद्याचा किमान निर्यात मूल्य प्रति टन 450 डॉलर (एफओबी) कर असेल.
उल्लेखनीय आहे की, गेल्या डिसेंबरमध्ये घरगुती खुदरा बाजारात कांद्याचा भाव 70-80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले होते. बाजारावर ताबा मिळवण्यासाठी याच्या निर्यातावर बंदी लावली होती. मागच्या महिन्यात कांद्याचा बाजार एकदम तुटला आणि शेतकऱ्यांनी विरोध निदर्शन सुरू केले. कांदा उप्तादक शेतकऱ्यांची समस्या पाहुन सरकारने याच्या निर्यातीवरील बंदी उठवली, परंतु याचे किमान निर्यात मूल्य 600 रुपये प्रति टन ठेवले जेणे करून स्वस्त कांदा निर्यातीला हतोत्साहित केले जाऊ शकेल.
Add comment