Business
Friday, 28 January 2011 21:23
नवी दिल्ली,23 जानेवारी (पीएसआय)
मोबाइल फोनवर व्हिडियो कॉलिंगसाठी अडथळा समाप्त झाल्यानंतर देशाची सर्वात मोठी मोबाइल सेवा देणाऱ्या भारती एअरटेलने एक आठवडयाच्या आत 3-जी मोबाइल सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे.
भारती एअरटेलचे सीईओ संजय कपूर यांनी सांगितले की, आम्ही पुढील सहा ते सात दिवसात आपली 3-जी सेवा व्यावसायिक सुरूवाती संदर्भात घोषणा करणार आहेत.
हे विचारल्यावर की, कंपनी कोणत्या भागात ही सेवा करेल, कपुर यांनी सांगितले की, या संदर्भात लवकरच घोषणा केली जाईल. भारतीने देशातील 22 दुरसंचार भागापैकी 13 भागात 3-जी सेवासाठी स्पेक्ट्रम मिळवले आहे.
आताच सरकारने मोबाइल नेटवर्कवर व्हिडिओ कॉल सुविधेची या अटीवर परवानगी दिली की, ऑपरेटर 31 जुलैपर्यंत यावर देखरेखीची सुविधा उपलब्ध करण्याची शपथ घेईल.
Add comment