Business
Tuesday, 18 January 2011 21:29
बीजिंग,17 जानेवारी (पीएसआय)
चीनचे भुगर्भशास्त्रज्ञांना दक्षिण चीन सागरमध्ये तेल व गॅसचे एक मोठे साठे आढळले. या व्यतिरिक्त चीन जवळील काही समुद्र भागातही तेल व गॅसचे साठे आढळले.
वृत्तपत्र 'चायना डेली' ने सोमवारी भुमी व संसाधन मंत्री यांच्या हवाल्याने लिहले की, उत्तरपूर्व चीन, उत्तर चीन व तिबेटच्या पठारात स्थित काही बेसिनांमध्ये तेल व गॅसचे साठे उपस्थित आहे.
त्यांनी सांगितले की, उत्तर-पूर्व चीनचे झिंजियांग उइगर स्वायत्त क्षेत्रात 192.7 अब्ज टन कोळशाचे साठे आढळले. तसेच झिंजियांग व मंगोलियातही यूरेनियमचे चार साठे आढळले आहे.
मंत्र्यांनी एक समारोहात सांगितले की, सध्याच्या संशोधनाने चीनमध्ये भावी संशोधनाचे मार्ग निश्चित केले.
त्यांनी सांगितले की, दक्षिण चीनचे सागर व किलियनच्या पर्वतामध्ये पहिल्यांदा ऊर्जेचे एक नवीन संसाधन नैसर्गिक गॅस हायड्रेटही आढळले आहे.
दक्षिण-पश्चिम चीनचे तिबेट स्वायत्त क्षेत्रात लिथियम कार्बोनेटचा एक साठा आढळला आहे.
Add comment