Business
Wednesday, 10 November 2010 22:34
न्यूयॉर्क,9 नोव्हेंबर (पीएसआय)
मायक्रोसॉफ्टने सोमवारी अमेरिकेतील बाजारपेठेत विंडो 7 फोन सादर केला. त्यासोबतच एक जाहीरात मोहीमही सुरु केली असून त्यात प्रतिस्पर्धी फोन ऍप्पलचा आयफोन आणि गुगलच्या ऍंड्रॉइल सिस्टिमची खिल्लीही उडवली गेली आहे.
यूटयुबवर टाकण्यात आलेल्या या जाहीरातीमध्ये प्रतिसर््पध्यांची टर उडवलेली दाखविली गेली आहे की, काही फोनचे डिझाईन खराब झाल्यामुळे ग्राहकांच्या वाईट वागणूकीत वाढ होत आहे.
मायक्रोसॉफ्टने या मोहीमेसाठी लोकप्रिय टिव्ही कलाकार रॉब डायर्डेक आणि अभिनेत्री मिंका केली यांना सामील केली आहे.
जाहीरातीत सांगितले गेले आहे की, मायक्रोसॉफ्टच्या नव्या विंडो 7 फोनचा उपयोग करणारे जसे आवश्यक कामांचा लवकरच निपटारा करू शकतात त्याचप्रकारे या फोनची डिझाईन चांगली असल्यामुळे फोनविषयक वागणूकीतील चांगल्या सवयीही लावू शकतात.
मायक्रोसॉफ्टच्या या फोनचा उपयोग कोठेही सहज करता येऊ शकतो हे या जाहिरातीतून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Add comment