Business
Friday, 05 November 2010 21:07
मुंबई, 4 नोव्हेंबर (पीएसआय)
देशातील प्रसिध्द उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी नुकतेच बांधलेले घर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वृत आहे की, मुकेश यांचे 27 मजली घर 'अंतालिया'च्या 50 फूट उंच सीमाभिंतीवरुन 'बेस्ट कमिटी'ने प्रश्न उपस्थित केला आहे. कमिटीचे म्हणणे आहे की, एवढी ऊंच सीमाभिंत बनवण्यासाठी अंबानी यांनी कोणत्याही अथॉरिटीची परवानगी घेतलेली नाही. आता कमिटीने या सीमाभिंतीच्या निर्मितीवरुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बेस्ट कमिटीचे सदस्य सुहास सामंत यांचा आरोप आहे की, मुकेश यांचे नवे घर 'अंतालिया'च्या बाजूला बेस्टचे स्टाफ क्वार्टर आहेत. काही दिवसापूर्वी प्लॉटसमध्ये पाच फूट भिंत होती. ती पाडून 50 फूट उंच सीमाभिंत बनवण्यात आली. सामंत यांचे म्हणणे आहे की, असे करण्यापूर्वी मुकेश अंबानी यांनी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही.
दरम्यान, या पुराव्याच्या आधारे बेस्ट आता तपासाला लागली आहे. आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर जगभरातील सर्वात महागडे घर वादात सापडले आहे.
Add comment