बीजिंग : नियमितपणे एखाद्या कामाचा सराव कोणत्याही व्यक्तीत विशेष गुण निर्माण करू शकतो.
चीनच्या लायोनिंग प्रांतात ली झियोगुआंग हा व्यवसायाने बँक कर्मचारी आहे.
बँकेत त्याचे मुख्य काम नोटा मोजणे आहे. नोटा मोजता मोजता त्याने असे कौशल्य आत्मसात केले की तो नोटा हुंगून तिचा मालक कोणता व्यवसाय करतो हे सांगतो.
बँकेत लीला नोटांची किमान शंभर बंडल मोजावी लागतात. प्रत्येक एक बंडल एक लाख युआनचे असते. आपल्या या कौशल्यावर ली म्हणतो, जर एखाद्या नोटेचा माशासारखा वास येत असेल तर तिचा धारक मासे व्यवसायाशी संबंधीत आहे, असे म्हणायला हरकत नाही.
जर वास कुबट येत असेल तर ती प्रौढ व्यक्ती असेल. तिने आपल्या जीवनाची पै पै जमवून खड्ड्यात लपविली असणार.