बर्लिन : बच्चे मन के सच्चे, असे म्हणतात. त्यांच्या निरागसपणाला कोणीही भाळतो. येथील एका घराचा मालक बाहेर गेल्यानंतर चोराने दरवाजाची बेल वाहविली तेव्हा मोलकरणीने दरवाजा उघडला.
त्यावेळी तिच्या शेजारच्या खोलीत घरमालकाचे दोन छोटी मुले होती. चोराने मोलकरणीच्या कानशिलावर पिस्तूल रोखीत आवाज करू नकोस. मला घरातील सामान नेऊ दे असे दरडावले. दरम्यान तेथे आठ आणि हस वर्षांचे दोन्ही मुले आली. ती पळतच आपल्या बेडरूममध्ये गेली आणि आपला पैशाचा गल्ला घेऊन आले.
त्यांनी चोराला हे पैसे देताना सांगितले की हवे तर हे पैसेदेखील घेऊन जा. चोराचे हृदय द्रवले. तो तेथून तडक निघून गेला.