अबुजा : नोकरीच्या दबावामुळे आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढता येत नाही, असे आपण नेहमी ऐकतो.
मात्र नाइजेरियाच्या एका वाहतूक पोलिसाने आपला नृत्याचा छंद आणि नोकरीचा ताळमेळ घातला आहे. तो आपल्या ड्युटीच्यावेळी अधूनमधून ब्रेक डान्स करीत वाहतूक नियंत्रण करतो.
यामुळे लोकांना काहीही त्रास होत नाही, असा त्याचा दावा आहे. कारण माझी डांस करण्याची पद्धती (स्टेप) वाहतूक नियमाना अनुकूल आहेत. त्यामुळे जनतेला माझ्या कृती समजण्यात अडचण येत नाही आणि वाहतूकही नियंत्रित राहते, असे तो सांगतो.
मायकल जॅक्सनचा चाहता असलेला हा पोलिस म्हणतो, यामुळे कामात अडथळ येत नाही आणि ब्रेक डान्स करण्याची इच्छादेखील पूर्ण होते.