लॉस एंजिलिस : अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्याची चौकशी करीत असताना महिलेचा चोरी झालेल्या आयफोनच्या फाइंड मॉय फोन अप्लीकेशनचा वापर करून दोन संशयितांना अटक केली.
लॉस एंजिलिस पोलिस विभागाच्या प्रवक्ता नोर्मा इसेनमैन यांनी सांगितले की, पीड़ित महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले की, बंदूकधाऱ्याने तिचा पर्स आणि आयफोन लुटला. त्यात मोबाइलचा ठिकाणा दर्शविणारे अप्लीकेशन होते.
नोर्मा यांनी सांगितले की, एका स्थानिक नागरिकाने मदतीची तयारी दर्शविली आणि आपल्या संगणकाचा उपयोग करू दिली.त्यामुळे अधिकाऱ्यांना आयफोनचा ठिकाणा शोधण्यास मदत मिळाली. आयफोन ११वा स्ट्रीट आणि अर्डमोर एवेन्यू दरम्यान असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळापासून ६.५ किलोमीटर अंतरावरील भागात गेले आणि काही वेळात एक संशयित आढळला. त्याला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी त्याच्या खिशातून आयफोन जप्त केला.