विचार करा की एक बियरचे घर आहे आणि त्याचे मालक तुम्ही आहात... नुसत्या कल्पनेनेच मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्यात ना?
जगातील लाखो पुरूषांचे हे एक स्वप्न असू शकते. पण ब्रिटनच्या निक वेस्टकरिता हे वास्तव आहे. त्याने आवड म्हणून बियरचे घर साकारले आहे. त्याच्या घरात केवळ बियरच्या बाटल्या भरल्या आहेत. जुन्या-नव्या सर्व प्रकारच्या बियरच्या कॅनींनी त्याचे घर भरले आहे. याचाच अर्थ भंगार पडून आहे, असे नाही तर व्यवस्थित मांडणी करून या वॅâनी लावून ठेवण्यात आल्या आहेत. लंडनच्या क्लेवेडॉन येथील बँकेत नोकरी करणाऱ्या ५१ वर्षीय निक गेल्या ३५ वर्षांपासून बियरच्या कॅनी जमा करत आहे. आता त्याच्याकडे सहा हजार ७८८ बियरच्या कॅनी जमा आहेत. एवढेच नाही तर ब्रिटनमध्ये सर्वात आधी बनलेल्या बियरची कॅनही त्याच्याकडे आहे. यासाठी त्याला सुमारे ९० हजार रुपये खर्च करावे लागले. बियरच्या कॅनी जमा करण्याची हौस त्याला १९७५ पासून आहे. डोबोरा नावाच्या प्रेयसीने त्याला या कामात मदत केली आहे. वयाच्या १६ वर्षांचे असताना डोबोराने त्याला बियरच्या कॅन जमा करण्याबाबतची एक पुस्तक भेट दिली होती. तेव्हापासून निक वॅâन जमा करतोय. डोबेरा आणि निकचे येत्या खिसमसला लग्न होणार आहे. निकने सांगितले, की बियरच्या अनोख्या छंदामुळे मी माझे प्रिय घर विकून टाकले. त्यामुळे डोबोरा नाराज झाली होती. पण तिने माझ्या भावनांना समजून घेत पाच रूमच्या घरात राहण्यास तयार झाली आहे.