मोबाईल फोनवरील टच स्क्रिन सुविधा आता बरीच जुनी झाली आहे. अलीकडे टॅबलेट पीसीवरही फूल टचस्क्रिनचा वापर होऊ लागला आहे. पण एखाद्या टेबलवर टचस्क्रिन तंत्र कधी पाहिले आहे का?
नाही ना. मात्र तेही आता अनुभवता येणार आहे. शास्त्रज्ञांनी असा एक जादूई टेबल बनवला आहे. जो संगणक आणि मोबाईलप्रमाणे टचस्क्रिन आहे. या मॅजिक टेबलवर ४० बोटे एकाच वेळी मल्टीटच इनपूट करण्यात मॅजिक टेबलला मदत करतात म्हणजेच त्यावर किमान चार वा जास्तीत जास्त आठ लोक ऑपरेट करू शकतात. आता ग्राहक स्क्रिनवर दिसणाऱ्या चित्रांना केवळ पाहणारच नाही तर त्यांची अनुभूतीही घेईल. एखाद्या बिझीनेस मिटिंगसाठी या मॅजिक टेबलचा वापर केला जाऊ शकतो. त्यावर पीडीएफ फाईल वाचलीही जाऊ शकते. तसेच त्यात मनोरंजनासाठी अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. त्यावर संगीताचे विविध सूरही छेडले जाऊ शकतील. भारतीय कंपनीने हा टचस्क्रिन टेबल बनविला आहे हे विशेष. त्याची किंमत अडीच लाखांपासून सुरू होते.