Interested News

 

सिल्चर(आसाम),28 ऑक्टोबर (पीएसआय)

आसाममध्ये 120 वर्षाच्या एका वृध्दने 60 वर्षीय महिलेशी विवाह केला. जेव्हा हाजी अब्दुल नूर व समोई बीबी विवाह बंधनात बंधले तेव्हा त्यांच्या विवाह समारोहात 500 पाहुणे उपस्थित होते.

करीमगंज जिल्ह्यातील सतगोरी गावात राहणाऱ्या नुरने रविवारी उत्तर फुलबारी गावात राहणाऱ्या समोईशी विवाह केला. नूर पुर्वी ठेकेदार होता.

 

आसामची राजधानी गुवाहाटीपासुन 400 किलोमीटर अंतरावर स्थित करीमगंजच्या सतगोरी गावात आयोजित या विवाह समारोहात 500 पाहुणे उपस्थित होते, जे या अद्भुत विवाह समारोहाचे साक्षीदार बनले.

स्थानिक शासकीय शाळेतील शिक्षक सैफुल अहमदने सांगितले, 'जेव्हा मदरसाचे वरिष्ठ शिक्षक मौलाना खैरूमाने विवाह करण्याच्या विषयात विचारले तेव्हा स्मित हास्य देऊन नुरने डोके हलवुन हो मध्ये उत्तर दिले. यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले.'

अहमदने म्हटले, 'जेथपर्यंत मला आठवते देशाच्या या भागात नुर विवाह करणारा सर्वात वृध्द व्यक्ती आहे.'

नुरने आपले दस्तावेज दाखवुन म्हटले, 'निवडणुक आयोगाच्या निवडणुक यादीत माझे वय 116 वर्षाचे आहे परंतु मी 120 वर्षाचा आहे.'

हा नुरचा पहिला विवाह नाही.

नुरची पहली पत्नी सलीमा खान होती. तिचे 2005 मध्ये निधन झाले होते. त्यांनी सांगितले, 'जेव्हा मी 40 वर्षाचा होतो तेव्हा मी सलीमाशी विवाह केला.'

सध्या तो 122 सदस्य असणाऱ्या कुंटुबाचा प्रमुख आहे. कुंटुबात त्यांचे दोन मुले, तीन मुली व अनेक नातवंडाचा समावेश आहे.नातवंडात बहुतांश विवाहित आहे. नुरच्या सर्वात लहान मुलीचे वय 79 वर्षे आहे. नुर ब्रिटिश काळात दक्षिणी आसाममध्ये ठेकेदारीचे काम करीत होता. तेव्हा त्याचे वय 50 वर्षाच्या जवळपास होते तेव्हा त्याची धोकादायक दुर्घटना झाली ज्यामुळे आजही त्याच्या पाठीत त्रास आहे. त्याचा मोठा मुलगा व सेवानिवृत्त शिक्षक हाजी अजीरउद्दीनचे म्हणणे आहे, 'माझ्या आईचे निधन झाल्यानंतर त्वरित माझ्या वडिलाने आम्हा लोकांना नवीन पत्नी शोधण्यास सांगितले जी त्यांचा संभाळ करू शकेल.'

त्यांनी सांगितले की, त्रिपुराचे अब्दुल हामिदच्या मदतीने त्यांना नवीन आई मिळाली, जिचे वय वडीलांपेक्षा निम्मे होते. तिच्या पतीचा मृत्यु झाला असुन तिला एकही मुळबाळ नाही. हामिद विवाह करवतो व तो नुरचा नातेवाईक आहे.

 

Add comment

Security code
Refresh

News

Edit

Amount of short articles:

Amount of articles links:

You can order sections with dragging on list bellow:

  • News
Save
Cancel
Reset

National

जकियाच्या याचिकेवर एसआयटीला

अहमदाबाद, १९ मे (पीएसआय)गुजरातमध्ये गुलबर्ग दंगलीत ठार झालेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया व जनसंघर्ष मंचच्या याचिकेवर स्थानिक न्यायालयाने एसआयटीला नोटीस काढली आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २५

Sunday, 20 May 2012 Comments

Sports

खेळाडूंचे निलंबन पर्याप्त नाही :

नवी दिल्ली, १६ मे (पीएसआय)केंद्रीय क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन यांनी आज म्हटले की, स्पॉट फिक्सिंगमध्ये कथितपणे समाविष्ट आढळलेल्या आयपीएल खेळाडूंना निलंबित करून भारतीय क्रिकेट बोर्ड आपले हात झटकु

Thursday, 17 May 2012 Comments

International

९-११ पासून आतापर्यंत पाकला अमेरिकेची २० अब्ज डॉलर

नवी दिल्ली,९ मे (पीएसआय)अमेरिकेच्या वल्र्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी आपला सहकारी पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून २०.७ अब्ज डॉलर निधी दिलेला आहे. परंतु

Thursday, 10 May 2012 Comments

Regional

निरोधासाठी आग्रह धरला म्हणून घटस्फोट घेता येणार

मुंबई, ४ मे (पीएसआय)तुमची पत्नी सेक्सप्रसंगी निरोध वापरण्यासाठी आग्रह धरीत असेल तर तुम्ही तिला विरोध करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पत्नीवर मूल जन्माला घालण्यासाठीही दबाव टाकू शकत नाही. विशेष

Saturday, 5 May 2012 Comments

Business

याहू २००० जणांना नोकरीवरून

कॅलिफोर्निया,५ एप्रिल (पीएसआय)इंटरनेट कंपनी याहूने म्हटले की, तो २००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कॅलिफोर्निया स्थित कंपनीने म्हटले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांपैकी १४ टक्केची छाननी करत आहे ज्यामुळे कंपनी 'लहान, गतिशील

Friday, 6 April 2012 Comments

Latest News